महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी मत्स्यखाद्य कारखान्याचे बोरपाडळे येथे उद्घाटन
– कोडोली (प्रतिनिधी) प्रो इंडो ॲक्वा फ्लोटिंग फिश फीड मिल या महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या पथदर्शी मत्स्यखाद्य कारखान्याचे उद्घाटन पुणे मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त अभय देशपांडे यांच्या हस्ते झाले. शिवसमर्थ असोसिएट्स अमृतनगर चे संस्थापक युवा उद्योजक विशाल जाधव यांनी हा प्रकल्प बोरपाडळे( ता. पन्हाळा )येथे उभारला आहे.
– माशांच्या वाढीसाठी आवश्यक असा खाद्यपुरवठा महाराष्ट्रात उपलब्ध नसून तो इतर राज्यांवर अवलंबून असल्याचे ओळखून युवा उद्योजक विशाल जाधव यांनी वारणेच्या उद्योग पंढरीस साजेसे असे पाऊल उचलत वरील प्रकल्प उभारला आहे.शिवसमर्थ असोसिएटस् ने बांधकामाशी संबंधित विविध क्षेत्रात काम करीत असताना इतर क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी शोधत असताना २०१३ साली उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा योग्य तो वापर करून शाहूवाडी तालुक्यात आंबा येथील मानोली डॅम मध्ये केज प्रकल्प सुरू केला . या माध्यमातून लोकांना ताजा जिवंत मासा देणे शक्य झाले . हा व्यवसाय करीत असताना असे लक्षात आले की आपल्याकडे पाण्याचा साठा उपलब्ध आहे, त्यामध्ये आपण मत्स्यपालन करू शकतो पण माशांच्या वाढीसाठी आवश्यक असे खाद्य पुरवठा महाराष्ट्रात उपलब्ध नसून तो इतर राज्यांवर अवलंबून आहे त्यामुळे व्यावसायिकांचे उत्पादन शुल्क वाढत असून बाजारपेठेमध्ये इतर विक्रेत्या पेक्षा दर वाढत असल्यामुळे बाजारपेठेतील चालू स्पर्धेत टिकता येत नाही.मत्स्य व्यावसायिकांना खाद्य जर जवळपास उपलब्ध झाले तर मत्स्य पालन करणारे व्यावसायिक सहजरीत्या उभे राहू शकतील आणि बाजारपेठेतील स्पर्धेत टिकून राहतील. म्हणून विशाल जाधव यांनी शासनाकडे याबाबत प्रस्ताव मांडला व शासनाने यासाठी मंजुरी दिली.
– प्रो इंडो अँक्वा फिश फिड मिल हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला पथदर्शी प्रकल्प असून दर दिवशी १२० टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प आहे .वारणा भागातील किमान १५० लोकांना रोजगार मिळणार असून शेतकऱ्यांना मका, सोया, भात ,हास्क अशा पर्यायी पिकांना वाव मिळणार आहे हा प्रकल्प उत्पादित करत असलेल्या खाद्यामुळे युवकांना चांगल्या दर्जाचे मत्स्यपालन करणे सोपे होणार आहे .या कारखान्यांमध्ये फ्लोटिंग फिश फीड बनवले जाणार आहे ज्याच्या मध्ये प्रोटीनचे प्रमाण अतिशय चांगले असल्यामुळे हायजेनिक मासा मार्केटमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. याआधी माशांच्या वाढीसाठी विविध प्रकारचे खाद्य घातली जात असत पण ते खाद्य पाण्याच्या तळाशी जाऊन बसत असे त्याच्यामुळे माशा संदर्भातील कोणत्याच गोष्टी आपणास समजणे अवघड होते. पण फ्लोटिंग फिश फीड हे पाण्यावरती तरंगत असल्याने मासा ते खाद्य खाण्यासाठी वरती येतो व त्यावेळी आपण त्या माशाचे सहज निरीक्षण करू शकतो की ज्यातून आपल्याला त्याची वाढ त्याला होणारे आजार याची सहज माहिती घेऊ शकतो. तसेच या खाद्य वापरा मुळे पाण्याचे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही अशी माहिती युवा उद्योजक विशाल जाधव यांनी या प्रसंगी दिली.
– या प्रसंगी सहआयुक्त मत्स्य विभाग तांत्रिक कोल्हापूर चे प्रदीप सुर्वे, कोडोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरज बनसोडे ,राजेंद्र बचाटे, किरण पाटील, बोरपाडळे गावचे सरपंच, विविध संस्थाचे पदाधिकारी, बाळासाहेब जाधव, नगरसेवक रूपाराणी निकम, आनंद साळुंखे , मित्र परिवार, शिवसमर्थ असोसिएटस् चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकल्प समन्वयक प्राजक्ता चव्हाण यांनी तर उद्योजक विशाल जाधव यांनी आभार व्यक्त केले.
208