यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज उल्लेखनीय – कोल्हापूर विभाग उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे
– कोडोली(प्रतिनिधी)वारणानगर ता.पन्हाळा येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला कोल्हापूर विभाग उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी भेट दिली. महाविद्यालयाचा परिसर, प्रयोगशाळा, परीक्षा मार्गदर्शन केंद्र याचबरोबर कोरोना काळात घेण्यात आलेली काळजी, विविध सोयी, सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी झालेल्या छोटेखानी समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डाॅ.वासंती रासम होत्या.
– डॉ. उबाळे यांनी प्राध्यापकांच्या शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की,” कोरोना काळात वारणा परिसर सुरक्षित ठेवल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. एकूण शैक्षणिक कामकाज आणि प्राध्यापकांचे उल्लेखनीय कार्य याचाही त्यांनी गौरव केला. ते पुढे म्हणाले की,” या काळात शिक्षण क्षेत्रा मध्ये अमुलाग्र बदल होत असून कितीही अडचणी असल्या तरी काळानुरूप उच्च शिक्षणात ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा यशस्वी प्रयोग होणे गरजेचे आहे.”
– प्रारंभी प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी महाविद्यालयाच्या एकूण शैक्षणिक कामकाजाचे आणि उपलब्ध सोयी सुविधांची माहिती दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विनर कोरे करिअर अकॅडमी चे समन्वयक डॉ. ए. आर. भुसणार, डॉ.यु. बी. चिकुर्डेकर यांनी भाग घेतला. डॉ.वासंती रासम यांनी संदर्भ ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. आभार कार्यालय प्रबंधक बाळासाहेब लाडगांवकर यांनी मानले.
– दरम्यान डॉ. उबाळे यांनी संस्थेचे अध्यक्ष आ.डाॅ. विनय कोरे सावकर याची ही भेट देऊन एकूण शैक्षणिक परिसर, वातावरण आणि वारणेचा वाघ चित्रपटातील आठवणी लहानपणा पासून वारणा परिसराबद्दल आकर्षण असल्याचे सांगून, परिसर पाहून भारावून गेल्याचे ही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत प्रशासकीय कामकाजातील मिलिंद कुरणे,डॉ. बी.टी. साळोखे,हरिष गायकवाड उपस्थित होते.
180