कोल्हापूर-जोतिबा मार्गावरील खचलेल्या रस्त्याचे काम भूगर्भ तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊन करणार – पालकमंत्री सतेज पाटील
-कोल्हापूर (प्रतिनिधी) जोतिबा कोल्हापूर या मुख्य मार्गावरील पाण्याचा टाका इथल्या खचलेल्या रस्त्याच्या या जमिनीबाबत भूगर्भ तज्ज्ञांचा अभिप्राय घेऊनच लवकरच हा रस्ता करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
– पालकमंत्री श्री. पाटील आज जोतिबा कोल्हापूर या मुख्य मार्गावरील पाण्याचा टाका येथे खचलेल्या रस्त्याची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी सरपंच राधा बुणे, उपसरपंच शिवाजी सांगले, अरुण शिंगे, अतिष लांदे, बाबासो चौगुले आणि संपत भोसले उपस्थित होते.
– रस्ता पाहणी प्रसंगी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, गेल्यावर्षी दोन कोटी रुपयांचा निधी खर्च करून हा रस्ता करण्यात आला होता. केंद्र शासनाच्या पुरहानी योजनेतून दोन कोटी रुपये खर्चून हा रस्ता करण्यात आला होता. मशीनच्या साहाय्याने खोदून दगड आणि भराव टाकून रस्ता घसरू नये म्हणून संरक्षणासाठी १५० मिटर लांबीची आणि पाच मीटर रुंदीची लोखंडी जाळीत दगडे भरून गॅबिन वॉल करण्यात आली होती. तरीही हा रस्ता पुन्हा खचला आहे. त्यामुळे या ठिकाणच्या जमिनीचा अभ्यास होणे गरजचे आहे. यासाठी मुंबईतील एक भूगर्भ संस्थेतील भूगर्भ तज्ञांना हा रस्ता दाखवून इथल्या जमिनीची माहिती घेऊन त्यांचा अभिप्रायानंतरच हा रस्ता केला जाईल.
142