कणेरी मठामध्ये क्वारंटाईन सेंटर सुरु
– कोल्हापूर (प्रतिनिधी) रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उद्देशाने पं. पू. श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धगिरी भक्त-निवास कणेरी मठ येथे कोविड-१९ विलगीकरण (क्वारंटाईन) कक्ष सुरु करण्यात आलेले आहे.
– कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या मृत्यूदरातही वाढ होत असून आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याने उपचाराविना अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना ६ दिवसानंतर स्थिर (स्टेबल) झाल्यावर पुढील क्वारंटाईनसाठी कणेरी मठावर फक्त २५०० रुपयांमध्ये सोय करण्यात आली आहे. त्यामुळे इतर कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी बेड रिकामा होण्यास मदत होणार आहे.
– या क्वारंटाईन सेंटरमध्येदिवसातून दोनवेळेस सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची भेट. (सकाळी ९ ते १२ व संध्याकाळ ५ ते ६), सुसज्य रूम्स आणि आवश्यक साधनांची उपलब्धता, आवश्यक वैद्यकीय साधने, शुद्ध हवेने युक्त असा सिद्धगिरी निसर्गरम्य परिसर, सकाळी एकवेळस सिद्धगिरी आयुर्वेदिक काढा, दिवसातून दोनवेळेस चहा, एकवेळ नाश्ता, दोनवेळच्या जेवणात सिद्धगिरी सेंद्रिय शेतीतील पालेभाज्यांचा समावेश, दिवसातून एकवेळेस सेंद्रिय फळे, दिवसातून चार ते पाच वेळा वाफ घेणेसाठी वाफेचे मशिन, पिण्यास शुद्ध पाणी तसेच पिण्यास व अंघोळीस गरम पाण्याची सुविधा उपलब्ध, सिद्धगिरी हॉस्पिटल मधील औषधे आणि सर्व तपासण्या(पँथोलोजी) नियम व अटींसह उपलब्ध, ऑक्सिजनची गरज पडल्यास उपलब्धतेनुसार सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन आणि बेडची सुविधा उपलब्ध आणि २४ तास नर्सिंग, रुग्णसेवा स्टाफ, अत्यावश्यक अंब्यूलन्स सेवा उपलब्ध असणार आहेत.
157