कोल्हापूर

मास्क नाही, प्रवेश नाही, सामाजिक अंतर नसेल तर पेट्रोल/डिझेल/गॅस वितरणही नाही – जिल्हाधिकारी दौलत देसाई

by संपादक

मास्क नाही, प्रवेश नाही, सामाजिक अंतर नसेल तर पेट्रोल/डिझेल/गॅस वितरणही नाही – जिल्हाधिकारी दौलत देसाई
– कोल्हापूर (प्रतिनिधी) ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार ‘मास्क नाही – प्रवेश नाही’ ‘सामाजिक अंतर नसेल तर पेट्रोल/ डिझेल/ गॅस वितरणही नाही’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील पेट्रोल व डिझेल वितरण पंप,गॅस वितरण केंद्रे यांच्या मार्फत ग्राहकांना सेवा पुरविल्या जातात. या ठिकाणी मोठया प्रमाणात सेवा मिळवण्यासाठी नागरिकांची येणे जाणे सुरु असते. या पार्श्वभूमीवर शासनाची ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमध्ये आपण व आपले अधिनस्त सर्व संबंधित वितरक सहभागी होऊन जाणीव जागृती करावी, अशी सूचना थोरात गॅस एजन्सी, आय ओसीद्वारा रामकृष्ण इण्डेन, पाटील गॅस एजन्सी, रिलायन्स पेट्रोल व एस्सार पेट्रोल या पेट्रोल व गॅस एजन्सींना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली आहे.
– “ माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” मोहीम जिल्हयामध्ये प्रभाविपणे राबविण्यासाठी सर्व नागरिकांच्या सहभागाने कोव्हीड -19 नियंत्रणासाठी आदर्श व आरोग्यदायी जीवनशैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिक- अधिक नागरिकांना प्रेरित करावे. कोव्हीड नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून कोव्हीड मुक्त जिल्हा करून कोव्हीड -19 आजार नियंत्रित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
– पेट्रोल व डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रांच्या ठिकाणी “ माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” व ‘मास्क नाही – प्रवेश नाही’ ‘सामाजिक अंतर नसेल तर पेट्रोल/ डिझेल/ गॅस वितरणही नाही ‘ – यानूसार प्रवेश व बाहेर जाण्याच्या मार्गावर दर्शनी भागामध्ये 10 X 15 चे मोठे फलक लावणे, पंपावर ठिकठिकाणी स्टिकर चिकटविणे व मास्क नसल्यास प्रवेश न देण्याचे बंधनकारक करणे. तसेच सामाजिक अंतर नसेल तर सेवा किंवा वस्तुचे वितरणही करू नये याबाबत सूचना देण्यात याव्यात.
– गॅस वितरण केंद्राच्या मार्फत शहरी व ग्रामीण भागामध्ये घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा वितरित केला जातो. गॅस सिलेंडर पुरवठा करत असताना, गॅस सिलेंडर वर “ माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” विषयक छोटे स्टिकर चिकटवून देण्याविषयी गॅस वितरण केंद्रांना सूचना देण्यात याव्यात.
– पेट्रोल व डिझेल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या टु व्हीलर, फोर व्हीलर व इतर प्रकारची वाहनांवर “ माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” विषयक छोटे स्टिकर चिकटविण्यात यावेत. पेट्रोल व डिझेल वितरण पंप, गॅस वितरण केंद्रें या ठिकाणी सेवा मिळवण्यासाठी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. त्याअनुषंगाने या ठिकाणच्या परिसरामध्ये वारंवार निर्जंतुकीकरण करण्याबाबतची कार्यवाही करावी.
– ही मोहिम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला नागरिकांचे तसेच आपले सहकार्य असणे अत्यंत आवश्यक आहे व त्यामाध्यमातून “ माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” हि मोहीम यशस्वीपणे राबवून कोव्हीड मुक्त जिल्हा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येईल या अनुषंगाने आपले अधिनस्त सर्व संबंधितांना योग्य सूचना देवून कार्यवाही करावी. या सूचनांची त्वरीत अमंलबजावणी करण्यात यावी. या सूचनांची उल्लंघन करणारे व्यक्ती / आस्थापना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील, याची नोंद घ्यावी असेही पत्रातनमुद केले आहे.

You may also like

Leave a Comment