आयुष्याच्या महत्वाच्या वळणावरती वारणेतील संस्काराची शिदोरी कधीही न विसरण्यासारखी – कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

by Admin

आयुष्याच्या महत्वाच्या वळणावरती वारणेतील संस्काराची शिदोरी कधीही न विसरण्यासारखी – कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के

– कोडोली(प्रतिनिधी)वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. डी. टी. शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाल्याबद्दल श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांच्या वतीने आणि संस्था संचालित विविध प्राचार्यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी डॉ.वासंती रासम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
– यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, तात्यासाहेब कोरे अभियांत्रीकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.व्ही. आणेकर, औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉन डिसोजा, श्रीमती शोभाताई कोरे कन्या महाविद्यालय येलूर चे समन्वयक प्रा. एस. आर. कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
– नूतन कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले की,”घरच्या लोकांच्या कडून सत्कार आणि भारावून गेलो आहे. आयुष्याच्या महत्वाच्या वळणावरती वारणेतील गणिताचे अत्यंत विद्वान प्रा. के. एस. शेवडे सरांच्या सारख्या महान व्यक्तींच्या कडून संस्काराची शिदोरी मिळाली. गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली जडण-घडण झाली ती कधीही न विसरण्यासारखी आहे‌.मिळालेल्या पदाचा उपयोग विद्यापीठाची आणि महाविद्यालयांची गुणवत्ता आणि विकास याच्यासाठी सर्वच जण मिळून एका ध्येयाने काम करूया अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.”यावेळी विद्यापीठ प्रशासनातील पदाधिकारीही उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment