कोल्हापूर

रोटरीने पोलिओ नंतर कॅन्सर मुक्त भारत करण्याचा घेतला ध्यास

by संपादक

रोटरीने पोलिओ नंतर कॅन्सर मुक्त भारत करण्याचा घेतला ध्यास
– होप एक्सप्रेसचा वारणा-कोडोलीतून शुभारंभ.
– कोडोली (प्रतिनिधी) इंडीयन कॅन्सर सोसायटी,मुंबई, कोल्हापूर कॅन्सर सेंटर ,रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 यांच्या संयुक्त विदयमाने आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या संयोजनाखाली कॅन्सर संदर्भातील जनजागृती आणि तपासणीसाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे.या अभियानांतर्गत होप एक्सप्रेस जी इंडियन कॅन्सर सोसायटी ने कोल्हापूर कॅन्सर सेंटर ला दिली आहे त्या विशेष बसच्या माध्यमातून कॅन्सर निदाना संदर्भातील महत्त्वाच्या तपासणी मोफत करण्यात येत आहेत. या अभियानाचा रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 चे गव्हर्नर रोटेरियन संग्राम पाटील यांच्या हस्ते रोटरेरियन श्रीकांत झेंडे, रोटरियन मंदार नलवडे, रोटरियन उद्योजक विशाल जाधव, डॉ.अर्जून शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे कार्यक्षेत्र असणारे महाराष्ट्रातील चार जिल्हे,संपूर्ण गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यातील आठ जिल्ह्यांमधून आम्ही आपल्या दारी कॅन्सरला हरवण्यासाठी हे ब्रीद घेऊन या होप एक्सप्रेसच्या माध्यमातून कॅन्सर जनजागृती आणि तपासणी शिबिरांचे आयोजन करणेत येणार आहे. या अभियानांतर्गत पहिले शिबिर रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरच्या माध्यमातून कोडोली हौसिंग सोसायटीच्या सांस्कृतिक भवनात आयोजित करणेत आले होते. या शिबिराच्या शुभारंभावेळी बोलताना रोटरी डिस्ट्रिक्ट 3170 चे गव्हर्नर संग्राम पाटील यांनी कॅन्सर विरोधातील लढाईसाठी जनजागृती आणि कॅन्सरचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे.रोटरी आणि कोल्हापूर कॅन्सर सेेंटरच्या माध्यमातून तीन राज्यांमध्ये होप एक्सप्रेसच्या माध्यमातून हेच काम केले जाणार असून त्यामुळे कॅन्सर विरोधातील लढाई सोपी होईल असा विश्‍वास व्यक्त केला.कोडोली मधील पहिल्या शिबिराच्या यशस्वीतेवरुन हे अभियान नक्की यशस्वी होईल असेही त्यांनी नमूद केले. प्रतिबंधात्मक कर्करोग विभाग, कोल्हापूर कॅन्सर सेंटर चे संचालक, डॉ.अर्जून शिंदे, म्हणाले, वेळेत आणि योग्य निदान झाले तर प्राथमिक स्थितीत कॅन्सर बरा होत असल्याने याबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही. अजूनही कॅन्सर तपासणीसाठी लोक स्वत:हून पुढे येत नाहीत त्यामुळे हा आजार बळावून कॅन्सरमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.होप एक्सप्रेस मुळे हे प्रमाण कमी करण्यात यश येईल. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष रोटेरियन श्रीकांत झेंडे यांनी होप एक्सप्रेस हा गव्हर्नर संग्राम पाटील यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यातून कॅन्सर संदर्भातील योग्य निदान करण्यासह उपचारांसंदर्भात मार्गदर्शन आणि मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे मार्गदर्शक युवा उद्योजक रोटेरियन विशाल जाधव यांनी रोटरी डिस्ट्रीक्ट 3170 ने होप एक्सप्रेस या व्यापक आणि महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात कोडोली मधून करत रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचा सन्मान केला असल्याचे सांगितले. रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे अध्यक्ष उद्योजक प्रवीण बजागे यांनी स्वागत केले व परिसरामध्ये रोटरी ग्रामसेवा मार्फत नवनविन सामाजिक उपक्रम राबवणार अशी ग्वाही दिली , खजिनदार प्राजक्ता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले तर सचिव जयदीप पाटील यांनी आभार मानले.कृष्णात जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. कोडोली येथील पहिल्या शिबिरात पन्नास जणांची तपासणी करणेत आली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसरचे माजी अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी सचिव विशाल बुगले,डॉ.अमित सूर्यवंशी,डॉ.सतीश पाटील,डॉ.शामप्रसाद पावसे,सुनील पोवार,संदीप रोकडे,उत्तम पाटील,प्रकाश सूर्यवंशी,रसिका डोईजड,प्रवीण कावळे,प्रमोद कावळे,पराग गोडबोले,अमोल पाटील,सचिन पाटील,भरत कडवेकर,शिवदत्त उबारे ,शिवाजी सुतार,अविनाश निकम,सागर पाटील,डॉ.अभिजीत जाधव, ,प्रवीण बावणे,अमर जगताप,यांनी परिश्रम घेतले.

You may also like

Leave a Comment