नवरात्री उत्सव काळात महिला कोरोना योध्दा सत्कार म्हणजेच स्री शक्तीचा सन्मान- सौ. प्रियदर्शनी मोरे
– कोडोली(प्रतिनिधी)नवरात्री उत्सव काळात स्री शक्तीची पूजा केली जाते याच उत्सव काळात कोरोना योध्दा महिलांचा सत्कार म्हणजेच स्री शक्तीचा सन्मान आहे असे गौरवउदगार कोल्हापुर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. प्रियदर्शनी मोरे / कदम यांनी काढले.
– कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण समिती सभापती अमरसिंह पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोडोली ग्रामपंचायत क्षेत्रातील आशा व अंगणवाडी स्वयंसेविका तसेच आरोग्य सेविका यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
– कोविड १९चा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने मार्च महिन्यापासून संपुर्ण जगाला या महामारीने झुंजावे लागत आहे.कित्येक लोक प्राणास मुकले. कित्येकांनी कोरोनाचा जीवघेणा खेळ अनुभवला.आपल्या स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आपले कर्त्यव्य अव्ह्याहतपणे व प्रामाणिकपणे पार पाडणारे योद्धा म्हणजे कोरोना योद्धा.या कोरोना योद्धाचें कौतुक करावे तितके कमीच.त्यानी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड करुच शकत नाही. असे प्रतिपादन कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.
– यावेळी अंगणवाडी सेविका वैशाली चव्हाण, आरोग्य सेविका श्रीमती नदाफ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी अशा ,अंगणवाडी सेविका वआरोग्य सेविका यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते साडीचा आहेर देऊन सत्कार करण्यात आला.
– कार्यक्रमास कोडोली अर्बन बँकेचे चेअरमन राहुल पाटील, व्हा. चेअरमन सचिन जाधव, संचालक प्रकाश पाटील ,हौसिंग सोसायटीचे चेअरमन मानसिंग पाटील , व्हा. चेअरमन प्रवीण पाटील, संचालक नरेंद्र पाटील, सर्वोदय सोसायटीचे संचालक माधव पाटील ,ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे , सदस्या सौ. मनीषा कुंभार, माजी ग्रामपंचायत सदस्य बाजीराव केकरे ,महेश महापुरे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक माधव पाटील यांनी तर स्वागत गणेश शेडगे यांनी केले.
177