दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान द्यावं – जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल
– कोडोली – (प्रतिनिधी) दिव्यांगांना आवश्यक ती मदत करण्या बरोबरच त्यांना स्वावलंबी बनवण्याची गरज असून समाजातील सर्व घटकांनी त्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.रोटरी ग्रामसेवा केंद्र वारणा परिसर व निर्माण सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग सहायता दिना निमित्त आयोजित कृत्रिम हात ,कृत्रिम पाय,व्हीलचेअर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले , दिव्यांगांसाठीच्या शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे. – येथील सर्वोदय सांस्कृतिक हॉल मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते.रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे प्रांतपाल संग्राम पाटील यांनी रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या दिव्यांगांसाठीच्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.रोटरी ग्रामसेवा केंद्राचे मार्गदर्शक उद्योजक रोटेरियन विशाल जाधव यांनी दिव्यांग बांधवांना उद्योग ,व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी महाराष्ट्रासह राजस्थान ,कर्नाटक, उत्तरप्रदेशातून आलेल्या ६५ लाभार्थींना एल एन -४ कृत्रिम हात,४ लाभार्थींना कृत्रिम पाय,२ लाभार्थींना वॉकर व ५ लाभार्थींना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोटरी ग्रामसेवा केंद्राच्या नाममात्र भाड्यात रुग्ण साहित्य उपलब्ध करुन देणाऱ्या आरोग्य सेवा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.डॉ.सतीश पाटील ,डॉ अमित सूर्यवंशी ,डॉ श्यामप्रसाद पावसे, डॉ .अभिजीत जाधव यांना कोविड काळातील योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करणेत आले. – यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे अध्यक्ष श्रीकांत झेंडे ,रोटेरियन ऋषीकेश केसकर ,जलाराम ट्रान्सपोर्टचे रोटेरियन गिरीश लिंबडा,चैतन्य विशेष मुलांची शाळेच्या स्नेहा शेटे यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी प्रवीण पाटील यांनी पन्हाळा अर्बन निधी (बॅंक) दिव्यांग बांधवांना उद्योग ,व्यवसायासाठी कर्जा वरील व्याजदरात तीन टक्के सवलत देईल अशी घोषणा केली.दिव्यांग बांधवांनी या घोषणेचे स्वागत केले. – रोटरी ग्रामसेवा केंद्राचे अध्यक्ष प्रवीण बजागे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव जयदीप पाटील यांनी आभार मानले. – या कार्यक्रमाला पन्हाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे ,सहायक गटविकास अधिकारी सावंत ,कोडोली ग्रामपंचायतीचे प्रशासक राजेंद्र तळपे , ग्रामविकास अधिकारी ए.वाय. कदम ,रोटरी ग्रामसेवा केंद्राचे सदस्य सुनील पोवार , प्रकाश सूर्यवंशी ,उत्तम पाटील, संदीप रोकडे ,प्रमोद कावळे ,प्रवीण कावळे ,अमर जगताप ,पराग गोडबोले ,सचिन पाटील ,अमोल पाटील ,प्रवीण पाटील ,डॉ अमित सूर्यवंशी ,डॉ .श्यामप्रसाद पावसे ,डॉ.अभिजीत जाधव,अविनाश निकम ,कृष्णात जमदाडे ,रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे सदस्य दिव्येश वसा ,मंदार नलवडे,श्रीकांत मोरे ,ऋषीकेश केसकर ,निखिल चौगुले,निर्माण सामाजिक संस्थेचे सतीश जाधव ,अमोल काळे ,संदीप किबीले ,शिवाजी साळुंखे ,रणजित परीट यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
173