कोल्हापूर

देशाचं भविष्य, राष्ट्राची संपत्ती शिक्षण विभाग घडवितो – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

by संपादक

– माझं शिक्षण माझं उपक्रमाबरोबरच आदर्श शाळा – कोरोना काळात शाळा बंद असतानाही शिक्षण सुरु – देशाचं भविष्य, राष्ट्राची संपत्ती शिक्षण विभाग घडवितो – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

– कोल्हापूर (प्रतिनिधी) कोरोना काळात शाळा बंद असतानाही शिक्षण मात्र सुरु होते. शिक्षण विभाग क्षिणाच्या माध्यमातून देशाचे भविष्य आणि राष्ट्राची संपत्ती घडवत आहे. ‘माझं शिक्षण मांझ’ भविष्य या उपक्रमाबरोबर आदर्श शाळाही संकल्पना शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिले.
– जिल्हा परिषदेच्या कणेरीवाडी येथील विद्या मंदिरात डिजिटल शाळेचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पालकमत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार संजय मंडलीक, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
– शालेय शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यावेळी म्हणाल्या कणेरवाडीच्या शाळेच्या चालत्या-बोलत्या भिंतीचा शिकवण देण्यासाठी आहेत. आता यापुढे कणेरावाडीचे नाव राज्यात घ्यावे लागेल शिक्षण आणि विद्यार्थ्यांनी राज्याचे नाव जगाच्या पातळीवर माठे करण्याचे काम केले आहे.शाळामधील गुणवत्ता पुढे कशी घेवून जायची हे आपलं पुढील धोरण आहे.
– सर्व मिळुन शिक्षणशेत्रात कोल्हापूरचे नाव मोठे करु असे सांगून इ. 8 वी चा वर्ग कणेरावाडी शाळेत देण्याची जबाबदारी माझी आहे असंही त्या म्हणाल्या.
– खासदार श्री. मंडलीक यावेळी म्हणाले, कारोना सारख्या संकटाचे संधीत रुपांतर कसे करायचे ते कणेरीवाडीने दाखवून दिले आहे. लोकवर्गणीतून शाळेचे रुप पालटलं आहे. हे देशात पहिले आदर्शवत काम असेल.
– आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, 30 लाखाच्या लोक वर्गणीतून अभिमानास्पद काम कणेरावाडीने केले आहे. जिल्हा परिषदची आदर्श शाळा म्हणून या शाळेची ओळख होईल रोल मॉडेल म्हणून ही शाळा उदयास येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीमाता सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दिपप्रज्वलनाने झाली. मुख्याद्यापक राहूल ढाकणे यांनी सर्वाचे स्वागत तर रामचंद्र कदम यांनी प्रास्ताविक केले.माजी सभापती शशिकांत खोत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम सभापती हंबिरराव पाटील शिक्षण सभापती प्रवीण यादव, महिला व बाल कल्याण सभापती पद्माराणी पाटील, समाज कल्याण सभापती स्वाती सासणे, करवीर पं. स. सभापती आश्विनी धोत्रे सरपंच शोभा खोत आदी उपस्थित होते.


You may also like

Leave a Comment