पन्हाळा अर्बनच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविणार – प्रविण पाटील
– कोडोली (प्रतिनिधी) महिला व महिला बचत गट यांना उद्योग व व्यवसाय करण्याकरिता पन्हाळा अर्बन निधीच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध करून देऊन महिलांना सक्षम व स्वावलंबी बनविणार असे प्रतिपादन पन्हाळा अर्बन निधीचे चेअरमन प्रविण पाटील यांनी केले.
– कोडोली येथील पन्हाळा अर्बन निधी बँकेने महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता विविध उद्योग व मशिनरी याविषयी महिलांना माहिती व्हावी याकरिता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्लू स्टार ऑटोमोबाईल इचलकरंजी चे व्यवस्थापक दिग्विजय पाटील होते.
– प्रविण पाटील म्हणाले महिलांना उद्योगाकरिता योग्य ते मार्गदर्शन करून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच गरजू महिलांच्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी पन्हाळा अर्बनच्या माध्यमातून अर्थसहाय्य करणार असून महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी पन्हाळा अर्बन कायम तत्पर राहील असेही आश्वासन दिले.
– यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना दिग्विजय पाटील म्हणाले आजच्या काळाची गरज पाहून महिलांनी विविध प्रकारचे गृहउद्योग सुरू करावेत या उद्योगाकरिता लागणारी मशिनरी आपण कमीत कमी दरात उपलब्ध करून देऊ असे सांगून विविध प्रकारच्या मशिनरीबद्दल माहिती उपस्थित महिलांना सविस्तर दिली. मॅनेजर दिपाली पाटील यांनी विविध बचत योजना व कर्ज योजना याविषयी माहिती दिली.
– कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शुभांगी महापुरे यांनी तर पाहुण्यांची ओळख दिपाली माने यांनी करून दिली.पन्हाळा अर्बन चे संचालक राजकुमार जाधव यांनी आभार मानले.
– याप्रसंगी संचालिका मनीषा जाधव, ज्ञानेश्वरी पाटील ,कर्मचारी अक्षय शेटे जनार्दन जगताप व स्वप्नील पाटील यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
130