कोल्हापूर

राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून दूध उत्पादकांना घामाचे योग्य दाम देऊ-अमरसिंह पाटील

by संपादक

राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून दूध उत्पादकांना घामाचे योग्य दाम देऊ-अमरसिंह पाटील
– कोडोली (प्रतिनिधी) दूध उत्पादकांना त्यांच्या घामाचे योग्य दाम देऊन संघाला यापेक्षा अधिक उर्जित अवस्थेत आणण्याकरिता व गावगाडा बळकट करण्याचे काम राजर्षी शाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करणार आहोत असे मत जि .प.चे माजी अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमरसिंह पाटील यांनी व्यक्त केले.
– गोकुळ निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजर्षी शाहू आघाडीतून अमरसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आम. विनय कोरे यांच्या मार्गदर्शनाखालील राजर्षी शाहू आघाडी गोकुळ दूध संघाबरोबर दुध उत्पादकांचे हित जोपासून उपेक्षित दूध उत्पादकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे सांगून या निवडणुकीत शाहू आघाडीचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
– यावेळी गोकुळ दूध सघांच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी अमरसिंह पाटील यांना जिल्हाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी यशवंत शिक्षण समुहाचे व्यवस्थापक डाॅ.जयंत पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते व सरचिटणीस ॲड.राजेंद्र पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती विशांत महापूरे, वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, रणजित शिंदे, अनिल कदुंरकर , कोडोली अर्बन बॅंकचे चेअरमन राहुल पाटील, कोडोली नागरी पतसंस्थेचे चेअरमन धीरज पाटील, कोडोली हौसिंग सोसायटीचे चेअरमन मानसिंग पाटील, कोडोलीचे उपसरपंच निखिल पाटील डाॅ.अभिजित इंगवले, विश्वास पाटील, मोहन पाटील यांच्यासह सावकर व भाऊ प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.


You may also like

Leave a Comment