कोल्हापूर

बहिरेवाडीत ५० जणांना निराधार योजनेच्या अनुदानाचा लाभ

by संपादक

बहिरेवाडीत ५० जणांना निराधार योजनेच्या अनुदानाचा लाभ
– एच.आर.जाधव सहकार समुहामार्फत उत्पादक – सभासदांना २५ लाख वाटप करणार
– कोडोली (प्रतिनिधी): बहिरेवाडी ( ता.पन्हाळा) येथील ग्रामपंचायत बहिरेवाडी व एच.आर.जाधव सहकार समुहाच्या माध्यमातून गावातील मंजूर झालेल्या ५० लाभार्थ्यना संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान रक्कमेचे वाटप व इतर गरजूना शासकीय योजनेचा लाभ देण्यात आला.
– एच.आर.जाधव सहकार समुहामार्फत गुढीपाडव्यानिमित्त यात्रा ठेव अंतर्गत दूध उत्पादकांना ४ लाख तर भिशीधारक सभासदांना २० लाख असे सुमारे २५ लाख रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहीती या समुहाचे संस्थापक व वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव यांनी बोलताना दिली.
– येथील बहिरेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील गरीब,गरजूंना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमांतून विधवा, परिपक्त्या,गरजू आणि अपंग अशा ५० हून अधिक लाभार्थीना अनुदान रक्कम,नवीन रेशनकार्ड व उत्पादकांना यात्रा ठेव रकमेचे वाटप दूध संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव,शुभलक्ष्मी महिला संस्थेच्या अध्यक्षा सुधाताई जाधव,लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव आदीं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
– पहिल्या टप्यात गावातील ५० लाभार्थ्याना लाभ देण्यात आला असून दुसऱ्या टप्यात उर्वरीत गरजूं लाभार्थ्यांना आणि सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत शासकीय योजनेचा लाभ कसा होईल यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी सांगून कोव्हीड-१९ लस घेण्याचे आवाहन केले.
– यावेळी योजनेसाठी सहकार्य केल्याबददल प्रशांत सिंहासने (कोडोली ),कोतवाल दिलीप खाडे व गुणवंत बिरंबोळे आदींचा सत्कार एच.आर.जाधव यांच्या हस्ते झाला.
– यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपक पाटील, राजेंद्र जाधव,संपत कणसे,विजय कावळे, हरी जाधव,बळवंत येवले,देवानंद जाधव, पांडूरंग पाटील,प्रशांत पाटील,जयश्री जाधव,धनश्री जाधव, यांच्यासह समुहातील संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी,लाभार्थी उपस्थित होते गुणवंत बिरंबोळे यांनी आभार मानले.

You may also like

Leave a Comment