कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहिरेवाडी येथील भैरवनाथ देवाची यात्रा रद्द
– मंदिर परिसरात येण्यास बंदी
– कोडोली (प्रतिनिधी) बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची दि. २४ व २५ एप्रिल रोजी होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देवस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती बहिरेवाडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी दिली.
– गेल्या काही दिवसापासून बहिरेवाडी परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. यामुळेच जत्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासकीय नियमांचे पालन करत मंदिर दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहील तसेच मंदिर परिसरात येण्यास नागरिकांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे .अशी माहितीही यावेळी सरपंच शिरीषकुमार जाधव यांनी दिली.
169
previous post