महात्मा गांधी हॉस्पिटल येथे कोरोना केअर सेंटर सुरू

by Admin

महात्मा गांधी हॉस्पिटल येथे कोरोना केअर सेंटर सुरू
-कोडोली (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय कोरोना महामारीच्या काळात श्री वारणा उद्योग व शिक्षण समूह व महात्मा गांधी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू केलेले समर्पित कोरोना सेंटर रुग्णासाठी लाभदायी ठरेल. या जागतिक महामारी च्या प्रसंगी कोरोना रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचारांबरोबरच सामाजिक आधार व दिलासा मिळाल्यास रुग्ण लवकर बरा होतो असे प्रतिपादन वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे यांनी केले.
– स्वागत व प्रास्ताविक डॉ शिल्पा कोठावळे यांनी केले. दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले तर कोरोना केअर सेंटर चे उद्घाटन आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते झाले
-आमदार डॉक्टर विनय कोरे पुढे म्हणाले जागतिक महामारीच्या प्रसंगी सर्वांनी सुरक्षा बाळगणे हे आद्य कर्तव्य आहे. तसेच या कोरोना केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली उपचार केले जातील.या कोरोना केअर सेंटर मध्ये डॉ.शिल्पाताई कोठावळे, डॉ. जयवंत पाटील ,डॉ. बसवराज देशमुख यांच्या अधिपत्याखाली तज्ञ 30 जणांचा स्टाफ रुग्णांवर उपचार व देखभाल करणार आहेत. या सेंटरमध्ये १०० बेडची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
-यावेळी डॉ. जयवंत पाटील ,डॉ.बसवराज देशमुख, तात्यासाहेब कोरे दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरीश कुलकर्णी,पन्हाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र जाधव ,डॉ विराज कोरे ,डॉ कौशल कोठावळे ,वारणा साखर कारखान्याचे संचालक प्रा.प्रदीप तोडकर ,प्रा . जीवनकुमार शिंदे ,सुधीर राऊत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार विकास चौगुले यांनी मानले.

You may also like

Leave a Comment