विद्युत वाहन खरेदी करा, ५०० रुपये अनुदान मिळवा. – पन्हाळा नगर परिषदेचा कौतुकास्पद उपक्रम.
– कोडोली( प्रतिनिधी) पन्हाळा शहरातील कुटुंबांनी विद्युत वाहन खरेदी केल्यास त्यांना पाचशे रुपये अनुदान देण्यात येणार असून चार्जिंग स्टेशन मधून विद्युत वाहन मोफत चार्जिंग करून देण्याचा ठराव पन्हाळा नगर परिषदेच्या सभेमध्ये करण्यात आला अशी माहिती नगराध्यक्ष सौ. रुपाली धडेल यांनी दिली.
-महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू आहे या अभियानाअंतर्गत विद्युत वाहनांना प्रोत्साहन मिळणे करिता ई रिक्षा घ्यावी असे पन्हाळा नगर परिषदेच्या सभेत ठरले. त्यानुसार दालमिया शुगर कंपनीने सी आर एस अंतर्गत फंडातून पन्हाळा नगर परिषदेत ई रिक्षा मोफत दिली असून या रिक्षा वरती चार्जिंग स्टेशन नगरपरिषदेच्या फंडातून उभारले आहे . विद्युत वाहन खरेदी करता प्रोत्साहन मिळावे म्हणून पन्हाळा शहरातील विद्युत वाहनधारकांना पूर्णपणे मोफत चार्जिंग करून दिले जाणार आहे.
– वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी अनुकरण केल्यास प्रदूषण कमी होऊन शासनाने सुरू केलेले माझी वसुंधरा अभियान यशस्वी होईल.
178