Contact Information

२१०६, हौसिंग सोसायटी, कोडोली (वारणा), ता. पन्हाळा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र-416114 Phone - 02328-223339 Mobile - 09822840039

We Are Available 24/ 7. Call Now.

*गडहिंग्लज पंचायत समितीला 25 लाखांचा, तमनाकवाडा ग्रामपंचायतीला **5 लाखाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार*
*- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण*

*- कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समिती आणि तमनाकवाडा ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्कारांचे ऑनलाईन वितरण करून ई-पेमेंटव्दारे पुरस्काराची रक्कम खात्यात जमा केली.*
– जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित असणारे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी गडहिंग्लज पंचायत समितीच्या सभापती रूपाली कांबळे, गटविकास अधिकारी शरद मगर यांना तसेच तमनाकवाडाच्या सरपंच अलका साळवी, ग्रामसेवक वासंती मगर यांना पुरस्कार प्रमाणपत्राचे वितरण केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव उपस्थित होते.

Was this helpful?

Share:

administrator

Leave a Reply

Your email address will not be published.