कोल्हापूर

कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्याकरीता बँकानी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

by संपादक

कोरोनाचा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्याकरीता बँकानी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
– कोल्हापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था व त्यांची ATM मशीन सुरू ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. परंतु, सुरू असलेल्या बँका/वित्तीय संस्था व त्यांची ATM मशीन असलेल्या ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याने कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोव्हिड-19 चा संसर्ग व प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यातील सर्व बँकाना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.
– 1) बँकांनी आपल्या कामकाजासाठी शासनाकडील मार्गदर्शक सुचनांनुसार आवश्यक कर्मचारी उपस्थित ठेवून ग्राहकांना सेवा द्यावी जेणेकरून ग्राहकांना बँकेच्या शाखेमध्ये कमीत-कमी वेळ व्यतीत करता यईल.
– 2) बँकांनी/वित्तीय संस्थांनी एका वेळेस कमीत कमी ग्राहकांना शाखेमध्ये येण्यास परवानगी द्यावी व प्रवेश केलेल्या ग्राहकांचे काम झाल्याशिवाय पुढील ग्राहकांना बँकेत आतमध्ये येण्यास परवानगी देऊ नये. दोन ग्राहकांमध्ये रांगेत 1 मिटर इतके अंतर ठेवावे.
– 3) सर्व बँकानी / वित्तीय संस्थांनी आप-आपल्या ग्राहकांना इतर वितरण पर्यायांचा म्हणजेच इंटरनेट बँकींग, मोबाईल बँकींग व युपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशिन इ. सुविधांचा वापर करण्याबाबत जागृती / अवाहन करावे.
– 4) बँकेत ग्राहकांना काऊंटर पासून 1 मीटर अंतर ठेवणे बाबत सुचीत करावे.
– 5) सर्व बँकांनी / वित्तीय संस्थांनी आप आपल्या एटीएम, कॅश/चेक डिपॉझिट, पासबुक प्रिटींग ई सेवा असणाऱ्या मशिनची वेळोवेळी स्वच्छता करावी व तसेच सर्व कर्मचाऱ्यांना व ग्राहकास सॅनिटायझर्स उपलब्ध करून देणेत यावे.

You may also like

Leave a Comment