Uncategorized

भटकंती…..रविवारची:- विवेक वैजापूरकर

by संपादक

✍️भटकंती…..रविवारची:- विवेक वैजापूरकर – कोल्हापूर शहरापासून पन्नास किलोमिटर दूर एक डोंगर आहे.साधारण चाळीस फूट पसरलेले पठार म्हणजेच, हा : किलचा’ डोंगर होय.विशेष बाब अशी की, हा आतून पोकळ असून अनेक गुहा निर्माण झालेल्या पाहवयास आपल्यास मिळतील.सह्याद्रीच्या कुशीतील अत्यंत सुंदर हा परिसर असून येथे एक मोठी गुहा आहे.या गुहेत “जाते ” (पूर्वी धन्य दळले जाणारे)असल्याचे स्थानिक बोलतात. येथे कार्विची घनदाट झाडी असल्यामुळे आम्हाला मात्र जाता आले नाही.महिलांना गुहेत प्रवेश नसल्याचे महिलाच सांगतात. ⛳ गुप्त हेर बहिर्जी नाईक यांचे वास्तव्य असल्याचं आम्हाला कळाले होते, मात्र स्थानिक लोकांकडून अशी काहीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही .येथे आंबा, जांभूळ, तोरणा, शिकेकाई, या झाडांचे अस्तित्व जाणवले.
– अशा ठिकाणी पर्यटक येत असतात.काहींचा हेतू मात्र जेवण बनविणे, दारू पिणे असा असतो. प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या इत्यादीमुळे पर्यावरणास मोठी हानी पोहचत असते. आपण मात्र हा ठेवा जपूया! 🙏🙏You may also like

Leave a Comment