कोडोली उपजिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन प्रकल्प लवकरच कार्यान्वित

by Admin

कोडोली उपजिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन प्रकल्प लवकरच कार्यान्वित
– जिल्ह्यात रोज दहा टन ऑक्सिजनची निर्मिती
– कोडोली( प्रतिनिधी) सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. कोरोना रुग्णांसाठी वाढत्या ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात गडहीग्लज उपजिल्हा रुग्णालय, आयजीएम इचलकरंजी, सीपीआर कोल्हापूर ,यासह कोडोली, गारगोटी, मलकापूर व राधानगरी या सात ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असून या सात प्रकल्पातून रोज दहा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. हे प्रकल्प २० जून पर्यंत कार्यान्वित होतील.
– सध्या जिल्ह्यात रोजची गरज भागेल इतकाच अगदी काठावर ऑक्सिजन पुरवठा होत आहे. पुढील काळात ऑक्‍सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता धरून जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई व पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला.
– कोडोली उपजिल्हा रुग्णालय येथे २९.१७ एन एम ३/एच आर इतक्या क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून त्याद्वारे १०० सिलेंडर प्रतिदिवस निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच ऑक्सिजन रिफिलिंग प्रकल्प देखील या ठिकाणी उभारण्यात येणार असून त्याद्वारे प्रतिदिन ४० सिलेंडर भरून देण्याची सोय होणार आहे.सध्या रोज 34 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज असून वरील सात ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून दहा मेट्रिक टनाची गरज पूर्ण होणार आहे. याकरिता सहा कोटीचा निधी लागणार असून या प्रकल्पात हवेतून ऑक्सिजन शोषले जाणार आहे. यातील नायट्रोजन व कार्बनडाय ऑक्साइड पुन्हा हवेत सोडून वैद्यकीय कारणासाठीचे शुद्ध ऑक्सिजन सिलेंडर मध्ये भरले जाणार आहे. अशी माहिती व्ही.ए.गायकवाड अधीक्षक अभियंता, यांत्रिकी विभाग कोल्हापूर यांनी दिली .यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यकारी अभियंता सु.म. बागेवाडी, उपअभियंता पी. बी. कुंभार, सचिन लाड हे अधिकारी या प्रकल्पासाठी काम करत आहेत.


You may also like

Leave a Comment