ऑटोरिक्षा परवानाधारकांना अनुदान वाटप

by Admin

*ऑटोरिक्षा परवानाधारकांना अनुदान वाटप*
*- कोल्हापूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1500 रू. अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागातर्फे संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली असून परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in <transport.maharashtra.gov.in/> या साईटवर सदर लिंक उजव्या वरच्या कोपऱ्यात शनिवार दि. 22 मे रोजी रात्रीपासून उपलब्ध होत आहे. संबंधितांनी त्या ठिकाणी अर्ज करावयाचा आहे.*
– सदर लिंक ओपन करून अर्ज करण्यापूर्वी ऑटोरिक्षा क्रमांक, लायसन्स, आधारकार्ड आदींचा वापर करावा. फक्त वारसाच्या प्रकरणांमध्ये परवान्याच्या मूळ प्रतीची आवश्यकता आहे.
– सर्व प्रक्रिया फक्त ऑनलाईनच करण्याची आहे. त्यानुसार 21 मे 2021 रोजी सर्व ऑटोरिक्षा संघटना, ड्रायव्हिंग स्कुल असोसिएशन्स, विमा प्रतिनिधी, वाहन व अनुज्ञाप्ती कार्यकर्ते यांच्यासाठी अर्ज कसा भरावा याचे ऑनलाईन प्रशिक्षण सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे (मो.क्र. 9405874762) यांनी दिले. अर्ज करताना काही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज करण्यासाठीचा फ्लोचार्ट सर्वांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व संघटना, स्कुल्स, विमा प्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यासह मोबाईल साक्षर शालेय व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीं यासाठीही ऑटोरिक्षा परवानाधारकांना मदत करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी केले.

You may also like

Leave a Comment