महाराष्ट्र

पोस्ट कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्यावी

by संपादक

पोस्ट कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्यावी
– कोडोली (प्रतिनिधी) पोस्टातील कर्मचारी व पोस्टमन यांचा थेट लोकांच्या बरोबर संपर्क येत असल्याने त्यांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. या गोष्टीचा विचार करून पोस्ट कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस द्यावी अशी मागणी पोस्ट कर्मचाऱ्यांच्याकडून होत आहे.
– देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे ही लाट कमी करण्याकरिता देशातील अनेक राज्यात लोॅकडाऊन सुरु आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे यासह सर्व स्थापना बंद आहेत. त्याचबरोबर सरकारी कार्यालय कमी कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरू आहेत. तसेच काही राज्यातील सरकारी, सहकारी, खासगी बँका सुद्धा बंद आहेत. अशा वेळी देशातील सर्व पोस्ट कार्यालये मात्र नियमितपणे आपली सेवा देत आहेत. ही सेवा देत असताना पोस्ट कर्मचाऱ्यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असल्याने पोस्ट कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे.
– पोस्टाच्या माध्यमातून रिकरिंग, अल्प बचत खाते, सुकन्या योजना अशा विविध योजना राबविल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्याकरिता अनेक लोक पोस्टात येत असतात त्यांना या योजनांची माहिती देणे, फॉर्म भरणे अशी कामे पोस्ट कर्मचाऱ्यांना करावी लागतात तर पोस्टमनला मनिऑर्डर, रजिस्टर ही त्या व्यक्तीचे सहीनेच घरी द्यावी लागतात त्यामुळे त्यांचा अनेक लोकांशी थेट संबंध येत असल्याने संसर्गाची अधिक भीती आहे. याकरिता पोस्ट कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे.

You may also like

Leave a Comment