सार्थकी मल्टीस्पेशालिटी कोविड केअर सेंटरला सर्वोतोपरी मदत करू- डॉ. अशोकराव माने
-पेठ वडगांव (प्रतिनिधी) कोरोना महामारी संकट काळात तत्पर सेवा देऊन अल्पकाळात नावारूपास आलेल्या सार्थकी मल्टीस्पेशालिटी केअर आणि केविड सेंटरला भविष्यात लागणारी सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन भाजप- जनसुराज्यचे नेते दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिले.
– भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने वडगाव (ता. हातकणंगले) येथील छत्रपती संभाजीराजे मेडिकल फौंडेशन संलग्नित सार्थकी मल्टीस्पेशालिटी आणि कोविड केअर सेंटर मधील रुग्णांना मास्क, सॅनिटायझर,पीपीई किटचे वाटप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे व हातकणंगले तालुका भाजप -जनसुराज्य नेते जि. प. सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते.
– स्वागत सार्थकी चे संचालक डॉ. विद्यासागर पाटील यांनी तर प्रास्ताविक नगराध्यक्ष मोहन माळी यांनी केले. कार्यक्रमास किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नाना जाधव, उद्योजक रामकृष्ण लोकरे, विवेकानंद पाटील, सुहास राजमाने, डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. चिंदानंद शिंगे, संजय दबडे, अमोल पाटील, कमलेश शिरवडेकर, प्रज्योत शहा आदी मान्यवर उपस्थित होते. आभार नाना जाधव यांनी मानले.
204
previous post