राहुल रेखावार कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी

by Admin

राहुल रेखावार कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी; दौलत देसाई यांची बदली
-कोल्हापूर(प्रतिनीधी )महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे कार्यकारी संचालक राहूल रेखावार यांची कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून कोल्हापूरचे विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मंत्रालयात बदली झाली आहे. – राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आल्या असून कोल्हापूरचे विद्यमान जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागात संयुक्त सचिवपदावर बढती मिळाली आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी येत असलेल्या राहुल रेखावार २०११ च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत. ते अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत होते.कोल्हापूरचे मावळते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोरोनाकाळात जिल्ह्यात उल्लेखनीय काम केले असून ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ हा संदेश त्यांनीच सर्वप्रथम राज्यभरात वापरात आणला होता.

You may also like

Leave a Comment