कोल्हापूर

कोरोना काळात शामराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणादायी ग्रंथाची निर्मिती – प.पू.अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी

by संपादक

कोरोना संकटकाळात शामराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणादायी ग्रंथाची निर्मिती – प.पू.अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी
ह.भ.प.शामराव चंद्रू चव्हाण महाराज लिखित ‘गुरूमुखीचे गुह्य’या ग्रंथाचे प्रकाशन
– कोडोली (प्रतिनिधी)कोरोना संकटकाळात मिळालेल्या सक्तीच्या विश्रांती काळाचा संधी म्हणून उपयोग केल्यामुळे ह.भ.प.शामराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणादायी ग्रंथाची निर्मिती झाली असून आपणही यातून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प.पू.अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले.
– बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील ह.भ.प.शामराव चंद्रू चव्हाण महाराज लिखित ‘गुरूमुखीचे गुह्य’या ग्रंथाचे प्रकाशन कणेरी मठाचे मठाधिपती अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्याहस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. संत साहित्यिक प्रा.शिवाजीराव भुकेले,प्रा.डाॅ. श्रीकांत पाटील, प्रा. के.जी.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
– याप्रसंगी बोलताना काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, संपुर्ण जग कोरोनामुळे वेठीस धरले आहे. कोरोना संकटाचा सामना करताना अनेक निर्बंधास आपण सामोरे जात आहोत. लाॅकडाऊन ही आपत्ती न मानता मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग आपण केला पाहिजे, या काळात चांगले वाचन केले पाहिजे ,चांगले ऐकले पाहिजे, चांगले अनुभवले पाहिजे. संत साहित्याचे अभ्यासक प्रा.शिवाजीराव भुकेले तसेच ह.भ.प.शामराव महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले.स्वागत प्रा.के.जी.जाधव यांनी केले सुत्रसंचालन संपतराव चव्हाण यांनी केले तर आभार बाबासाहेब कावळे यांनी मानले.
– यावेळी शंभरवेळा रक्तदान करणारे वसंतराव चव्हाण यांचा अदृष्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास साहित्यिक पी.एस.पाटील, परशराम आंबी,प्रदिप चव्हाण, शिवाजी पाटील, भास्कर जाधव, जालंदर सुतार, संजय गुरव,विलास चव्हाण, एम.के.जाधव,बाबा जाधव,तानाजी पाटील यांच्यासह स्वामी भक्तगण आणि नागरिक उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment