केंद्रीय पथकाची सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रास भेट

by Admin

*केंद्रीय पथकाची सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लसीकरण केंद्रास भेट*
– कोल्हापूर ता.15 (प्रतिनिधी) केंद्रीय पथकाने गुरुवारी दुपारी सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या लसीकरणाबाबतची माहिती घेतली. त्याचबरोबर लसीकरण कामकाज कशा पद्धतीने चालते याची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी महापालिकेच्या लसीकरणाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या केंद्रीय पथकामध्ये राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे, उप-संचालक डॉ. प्रणिल कांबळे, उरोरोग तज्ञ सहा.प्राध्यापक डॉ सत्यजित साहू, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ हेमंत खरणारे उपस्थितीत होते.
– कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत बैठकीत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी महानगरपालिकेने केलेल्या कामकाजाची प्रेझेंटेशनद्वारे या पथकाला माहिती दिली. यावेळी महापालिकेने शहरामध्ये जे संजीवनी अभियान राबविले आहे त्याचे केंद्रीय पथकाने कौतुक केलेले आहे. महापालिकेने चांगले काम केले असून त्याची राज्यपातळीवर दखल घेतली आहे.
– दुपारी या पथकाने सावित्रीबाई फुले रुग्णालयातील नागरी आरोग्य केंद्रास भेट दिली. यावेळी नागरीकांना देण्यात येणा-या सोयी सुविधा ज्या दिल्या जात आहेत त्याची पाहणी केली. यावेळी उप-आयुक्त निखील मोरे यांनी महापालिकेच्यावतीने लसीकरणावेळी देण्यात येत असलेल्या सोयी सुविधेची माहिती दिली. महापालिकेचे लसीकरणाचे काम चांगल्या पध्दतीने सुरु असून याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. शहराची दैनदिन 6000 लसीकरण करण्याची क्षमता असल्याचे उप-आयुक्तांनी पथकाला सांगितली. त्यामुळे जिल्हयासह शहराला जास्तीजास्त व्हॅक्सीन दयाची अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे पथकानेही जिल्हयासाठी जास्ती जास्त व्हॅक्सीन उपलब्ध करुन देऊ असे सांगितले.
– यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ फारुख देसाई, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा, वैद्यकीय अधिकारी डॉ रुक्सार मोमीन, लसीकरण नोडल अधिकारी डॉ.अमोलकुमार माने आदी उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment