नोंदणीकृत नसणाऱ्या बनावट पत्रकारांवर कारवाई होणार – माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राठोड

by Admin

नोंदणीकृत नसणाऱ्या बनावट पत्रकारांवर कारवाई होणार -माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोड
-नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भारताच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने आरएनआयद्वारे तसेच माहिती आणि प्रसारण खात्याकडे नोंदणीकृत नसणार्या सर्वच प्रसार माध्यमातील बनावट पत्रकारांवर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन माहिती व प्रसारण राज्यमंत्री कर्नल राजवर्धनसिंग राठोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले ते म्हणाले की, देशभरात बनावट पत्रकारांचा सुळसुळाट झाला असून अशा पत्रकारांची त्वरित चौकशी करून ज्यांच्याकडे बनावट अथवा बेकायदेशीर प्रेस ओळखपत्रे सापडतील त्यांच्यावर तसेच या प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीस त्वरित कारवाई करून अटक केली जाईल.
– कर्नल राजवर्धनसिंग राठोड म्हणाले की, काही दोषी लोकांमुळे चांगल्या, खऱ्या आणि प्रामाणिक पत्रकारांची प्रतिमा खराब होत आहे. आणि त्यांच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. अधिक माहिती देताना राठोड म्हणाले की, बनावट प्रेस आयडी वाटप करणे आणि बनावट पत्रकारांना कामावर ठेवणे आणि प्रेसच्या नावाखाली ब्लॅकमेल करण्याचा व्यवसाय काही पैसे घेऊन संपूर्ण देशात सुरू आहे. जे नियंत्रित करणे आवश्यक आहे. सर्व राज्यांच्या माहिती मंत्रालयांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार भारत सरकारच्या आरएनआय द्वारे नोंदणीकृत किंवा टीव्ही / रेडिओ माहिती प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणीकृत असलेले वृत्तपत्र / मासिक पत्रकार / वार्ताहर नियुक्त करू शकेल आणि फक्त त्याचे संपादकच प्रेस कार्ड जारी करु शकतात. जेव्हा पत्रकारांनी न्यूज पोर्टलविषयी विचारले तेव्हा राठोड यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की माहिती व प्रसारण मंत्रालयात इंटरनेटवर चालू असलेल्या न्यूज पोर्टलच्या नोंदणीची कोणतीही तरतूद नाही आणि केबल (डिश) टीव्हीवर कोणतेही न्यूज पोर्टल व न्यूज चॅनेल चालू नाहीत.तसेच असे न्यूज पोर्टल व न्युज चॅनल कोणत्याही प्रकारच्या पत्रकाराची नेमणूक करू शकत नाही किंवा प्रेस आयडी जारी करू शकत नाही, जर कोणी असे केले तर ते बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल .

You may also like

Leave a Comment