*नील अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून १००अब्ज डाॅलर्सचे भारताचे उद्दिष्ट -केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह*
* नवी दिल्ली (प्रतिनिधी) भारताने खोल समुद्रातील मोहीम आणि महासागरातील संसाधनांच्या माध्यमातून१०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक “नील अर्थव्यवस्थेचे ” उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. * नवी दिल्लीत भू विज्ञान मंत्रालयाच्या वैज्ञानिकांना संबोधित करताना त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीला आणखी गती देण्यासाठी सागरी अन्वेषणाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले. ते म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेला अंदाजे ११० अब्ज रुपयांपर्यंत मदत करण्याच्या दृष्टीने ही एक नवीन संधी असून भू – विज्ञान मंत्रालयाने आखलेल्या “डीप ओशन मिशन”चे काम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या सहकार्याने केले जाईल आणि वेगवेगळ्या मंत्रालयांतर्गत कार्यरत विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांचे प्रयत्न एकत्रित करण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असून “डीप ओशन मिशन” चे सर्वसामान्यांनाही दूरगामी फायदे होतील.या मोहिमांधून शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्यात आणि समुद्राच्या पट्ट्यातून खनिजे उत्खनन करण्यासाठी आणि पाण्याचे पृथक्करण करण्यास मदत होणार आहे.
342