कोल्हापूर

कोडोलीत रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

by संपादक

कोडोलीत रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद : २६७ रक्तदात्यांचा सहभाग रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सनराईज कडून आयोजन
-कोडोली (प्रतिनिधी ) स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सनराईज आणि रोटरी ग्राम सेवा केंद्र वारणा परिसर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास कोडोली येथे मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
– कोरोना काळात जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत परिवावाराने राज्यभरात घेतलेल्या रक्तदान उपक्रमाला भरभरून प्रतिसाद लाभत आहे. रक्तदान चळवळ रुजलेल्या कोडोली परिसरातही या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.
– यावेळी रोटरीयन्स युवा उद्योजक विशाल जाधव म्हणाले, रोटरी ग्राम सेवा केंद्रातर्फे वारणा कोडोली परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.यापुढील काळात असेच सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातील.यावेळी शंभर वेळा रक्तदान करणारे वसंतराव शामराव चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
– यावेळी रोटरी ग्राम सेवा केंद्राचे अध्यक्ष प्रवीण बजागे, रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सनराईजचे सेक्रेटरी दिव्यराज वसा, विश्वेश कोरे,कोडोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशिद, पीएसआय नरेंद्र पाटील, कोडोलीच्या सरपंच मनिषा पाटील, उपसरपंच निखिल पाटील, कोडोली अर्बन बॅंकेचे चेअरमन राहूल पाटील, वारणा दुध संघाचे संचालक शिवाजी जंगम , ट्रेझरर कृष्णात जमदाडे, डॉ. अभिजित जाधव,विशाल बुगले,जयदीप पाटील, प्राजक्ता पाटील,रसिका डोईजड, पराग गोडबोले, प्रकाश सुर्यवंशी, संदिप रोकडे,सचिन पाटील, भारत कडवेकर,अमर जगताप,डाॅ. शामप्रसाद पावसे,डाॅ. अमित सुर्यवंशी, सागर पाटील, अविनाश निकम ,उत्तम पाटील,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment