कोल्हापूर

जिल्ह्यातील ७८ गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण

by संपादक

जिल्ह्यातील ७८ गावात १०० टक्के लसीकरण पूर्ण
– कोल्हापूर (प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ४५ वर्ष आणि त्यापुढील वयांच्या नागरीकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचेही १०० टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे.
– कोल्हापूर जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जिल्हाभर लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून सर्व गावांत जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणावर भर देण्यात येत आहे.४५ वर्षावरिल लसीकरण पुर्ण झालेल्या या ७८ गावांमधील ३३ गावांमध्ये कोरोनाचे शुन्य रुग्ण, ३० गावात ५ पेक्षा कमी रुग्ण, ९ गावांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण तर ६ गावांत १०पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या ७८ गावांनी नियोजनबध्दरित्या प्रयत्न केल्यामुळे केवळ २४४ इतके रुग्ण आढळून आले असून या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लवकरच हे रुग्ण बरे होतील असा आशावाद आरोग्य विभागाने व्यक्त करत इतर गावांनीही कोरोनाला गावच्या वेशीवर थोपवून धरावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

You may also like

Leave a Comment