वारणेत एक आँगस्ट पासून वर्षा व्याख्यानमालेचे आयोजन – आमदार डॉ.विनय कोरे
वारणानगर (प्रतिनिधी )येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने गेली ४६ वर्षापासून पावसाळ्यात सुरु असलेली ” वर्षा व्याख्यानमाला ” यावर्षी दि.१ ते ७ आँगस्ट २०२४ या कालावधीत होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षीची ही वर्षा व्याख्यानमाला येथील लाल बहादूरशास्त्री भवनामध्ये दि.१ ते ७ आँगस्ट २०२४ कालावधीत दररोज सायंकाळी सहा वाजता होणार असून या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ विनयरावजी कोरे यांच्या शुभहस्ते व संस्थेचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन शारदा वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष एस आर भगत आणि कार्यवाह बी .बी. दोशिंगे यांनी केले आहे.
वर्षा व्याख्यानमालेत होणारी व्याख्याने पुढीलप्रमाणे…
◾गुरूवार दि १ आँगस्ट – श्री प्रा रवींद्र खैरे , कोल्हापूर, विषय :- ” जगण्याची बदलती परिमाणे..”
◾शुक्रवार दि २ आँगस्ट – श्री जयवंत आवटे ,कुंडल, विषय :- ” सदाबहार ग्रामीण कथाकथन “
◾शनिवार दि ३ आँगस्ट – श्री .अँड संभाजीराव मोहिते, कराड,विषय :- ” मला भेटलेली माणसं…. “
◾रविवार दि ४ आँगस्ट- साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, साहित्यिक कृष्णात खोत, कोल्हापूर, विषय :- ” विस्थापनाचे वर्तमान… “
◾सोमवार दि ५ आँगस्ट- पत्रकार श्री ताज मुलाणी, कोल्हापूर,विषय :- ” बदलता समाज आणि आपले संस्कार… “
◾मंगळवार दि ६ आँगस्ट- श्री मधुकर पाटील , कोल्हापूर,विषय :- “जगावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे, लढावे छत्रपती शंभूराजांच्या सारखे… “
◾बुधवार दि ७ आँगस्ट – श्री महेंद्र कुलकर्णी, पन्हाळा,
विषय :- ” क्षणिक परि सुंदर…. “
या पत्रकार परिषदेस शारदा वाचन मंदिराचे सदस्य जगन्नाथ चरापले, प्रमोद पाटील, अनंत पाटील, शशिकांत कुलकर्णी, जयसिंग पाटील, ग्रंथपाल ग्रंथमित्र बाबासाहेब कावळे ,सहाय्यक ग्रंथपाल सौ जयश्री पाटील आदी उपस्थित होते.