कोडोली(प्रतिनिधी) येथील आदर्श असोशिएशनचा ‘आदर्श गौरव’ पुरस्कार 2024 सोहळा श्री वारणा भगिनी मंडळाच्या कार्यालयात नुकताच संपन्न झाला.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली .
प्रास्ताविक आदर्श चे संस्थापक सुखदेव कुंभार यांनी केले.श्री कुंभार म्हणाले आदर्श २००७ पासून आदर्श स्वच्छता अभियान, वृक्षारोपण यासारखे सामाजिक उपक्रम राबवत आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठी असोसिएशन कडून “आदर्श गौरव” पुरस्कार दिला जातो.
यावेळी “आदर्श गौरव२०२४” पुरस्काराने ओंकार पाटील यास मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. आपल्या अपंगत्वावर मात करून शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग यशाबद्दल त्याला असोसिएशन चा पुरस्कार देत असलेचे श्री कुंभार यानी सांगितले.
यावेळी दहावी, अकरावी आणि बारावी मधे पहिल्या पाच क्रमांकामध्ये येण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला आणि गणित विषयांमध्ये शंभर पैकी 100 मार्क मिळवलेल्या निलेश लाड व ईश्वरी गिरी या विद्यार्थ्यांना रुपये दहा हजारचा धनादेश देऊन गौरवान्वित करण्यात आले. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ओंकार म्हणाला की माणसाच्या मनामध्ये जिद्द असेल आणि माणूस मनाने खंबीर असेल तर कोणतेही ध्येय प्रयत्न आणि कष्टाने प्राप्त करू शकतो.
प्रमुख पाहुण्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाल्या, “जीवनामध्ये ध्येय ठरवताना प्लॅन बी सुद्धा तयार ठेवा जेणेकरून प्लॅन ए मध्ये अपयश आले तर प्लॅन बी च्या वाटेने जाऊ शकता असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वारणा शिक्षण प्रसार मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्री. विलास कारजिन्नी म्हणाले, “डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या पलीकडे सुद्धा आर्किटेक्चर, फार्मसी, एग्रीकल्चर, डिझायनिंग असे अनेक पदवीचे कोर्सेस आहेत या कोर्सेस मध्ये सुद्धा तुम्ही विद्यार्थी उज्वल करिअर करू शकता.
विद्यार्थी दशेमध्ये गुरूंचे महत्त्व विशद करून आभार आदर्शचे संचालक भगवान पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन महेंद्र कुलकर्णी यांनी केले.संयोजन सचिव चिंतामणी कुंभार व सहकारी यांनी केले.