कोल्हापूर

कोडोली बस स्थानकाची अपुरी कामे त्वरित पूर्ण करावीत अन्यथा आंदोलन करणार -राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे निवेदन

by संपादक

              कोडोली:(प्रतिनिधी) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बस स्थानकास मोठ्या प्रमाणात गळती लागली असून बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. याची दखल घेऊन बसस्थानकाची अपुरी कामे त्वरित पूर्ण करावीत अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार  पक्षाने निवेदनाद्वारे कोडोली बसस्थानक वाहतूक नियंत्रण अधिकारी तानाजी मोरे यांना पक्षाचे जिल्हा अध्यक्ष(कोल्हापूर ग्रामीण) अदिक जाधव यांनी दिला आहे

            दोन वर्षांपूर्वी सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बसस्थानकात पिण्याचे पाण्याची सोय नाही, तसेच स्वच्छतेच्या अभावामुळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे.  याबरोबरच अनेकांची खाजगी वाहने बसस्थानक आवारात कायमस्वरूपी पार्किंग केली जात आहेत याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तरी सदरची कामे त्वरित मार्गी लावावीत असे  निवेदनात म्हटले आहे.

            यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप जाधव, अशोक पाटील, समीर शेख, युवराज गोसावी, रोशन काळे, सलीम अत्तार, संपत जाधव, शुभम गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment