कोल्हापूर

गायत्री सरनाईक बहिरेवाडीच्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षक सासूच्या पाठिंब्यावर सून बनली पीएसआय

by संपादक

              कोडोली:( प्रतिनिधी) बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील गायत्री सरनाईक यांनी जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर महिला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेतून त्यांनी हे यश संपादन केले. या यशात त्यांना सासूबाईंचे मोठे पाठबळ मिळाले.

                गायत्री सरनाईक यांचे माहेर आपटी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण पन्हाळा येथे पूर्ण झाले. त्यांचे पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण वारणा महाविद्यालयात झाले. गायत्री यांचे पहिल्यापासून पीएसआय होण्याचे स्वप्न होते. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सन 2020 साली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली त्यावेळेस दोन गुणांनी त्यांची संधी हुकली. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याकरिता त्यांच्या घरच्यांनी व सासूबाईंनी पाठिंबा दिल्याने त्यांनी पुन्हा जिद्दीने अभ्यास करून 2022 मध्ये परीक्षा दिली आणि त्या यशस्वी झाल्या.

               गायत्री सरनाईक यांनी सासूबाईंच्या पाठबळावर यशस्वी झेप घेतली परंतु त्यांच्या सासूबाईंचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाल्यामुळे त्या गेली चार महिने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. एकीकडे परीक्षा पास झाल्याचा आनंद तर दुसरीकडे सासूबाई दवाखान्यात असल्याचे दुःख ही त्यांच्या कुटुंबावर आहे. गायत्री या बहिरेवाडीच्या माजी ग्रामपंचायत सदस्या असून पन्हाळा पंचायत समितीच्या सदस्य पदाची त्यांनी निवडणूक लढवली होती.

You may also like

Leave a Comment