कोडोली ( प्रतिनिधी) भविष्यात समाजात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. ही अराजकता समाज व देशाला परवडणारी नाही असे सांगून वाचन संस्कृतीच्या ऱ्हासामुळे समाज झुंडशाही कडे वळत आहे असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी मांडले.
कोडोली (ता. पन्हाळा )येथील प्राथमिक शिक्षक अनिल शिणगारे यांनी लिहिलेल्या ‘कल्पनेच्या तीरावर’ व ‘करामती बाळू’ या दोन बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रा. खोत यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी पन्हाळ्याचे गटशिक्षणअधिकारी शिवाजी मानकर, राजश्री शाहू परिवार नेते बबन केकरे,दिपाली शिणगारे हे उपस्थित होते .
प्रा. खोत म्हणाले समाजातील कल्पनाशक्ती मारली जात आहे. त्यामुळे तो समाज यांत्रिक होऊन निराशाकडे जात आहे. भाषा शुद्ध व अशुद्ध असत नाही तरी ती भाषाप्रमाण असते. यावेळी अनिल शिणगारे म्हणाले वाचन समृद्ध असेल तर लेखक घडेल असा असा आशावाद व्यक्त करून बाल सहवास भरपूर लाभला असल्याचे सांगितले. यापूर्वी अनिल शिणगारे यांच्या ‘गोपाळाची पोर’हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. प्रास्ताविक राजश्री शाहू पतसंस्थेचे चेअरमन प्रताप राबाडे यांनी केले . सूत्रसंचालन बबलू वडर यांनी तर आभार बाबासाहेब पाटील यांनी मांनले.