कोल्हापूर

विद्यार्थ्यांनो जिद्द ठेवा, यश नक्की मिळेल-जयश्री देसाई

by संपादक

मामासाहेब गुळवणी  स्मृतिदिनानिमित्त वारणेत ७० गुणवंतांचा सत्कार                      

                 कोडोली (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनो जिद्द ठेवल्यास यश नक्की मिळेल असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.  वारणानगर येथील वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे मार्गदर्शक व स्व. तात्यासाहेब कोरे यांचे जेष्ठ सहकारी स्व. मामासाहेब गुळवणी यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त वारणा परिसरातील दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रथम आलेल्या ७०गुणवंत विध्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी वारणा कारखाना कार्यक्षेत्रातील १२ युवक -युवतीची स्पर्धा परीक्षे  मधून विविध पदावर निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीआम. विनय कोरे होते.

                 वारणा साखर कारखाना , वारणा सत्कार्य, वारणा युवक, क्रीडा प्रबोधिनी, महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या समारंभाचे संयोजन केले होते. कार्यक्रमास पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे – जाधव, वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षा स्नेहताई  कोरे , श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही. व्ही कारजिन्नी, वारणा सत्कार्य मंडळाचे विश्वस्त के. एम . वाले, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव , वारणा दूध संघाचे संचालक माधव गुळवणी   शिवाजीराव जंगम , कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा

         प्रास्ताविक ग्रंथमित्र प्रा. के. जी. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. आर. कुलकर्णी,प्रा. यु. आर. पाटील, राजेंद्र पाटील , संजय जाधव,लखन करे,  युवराज जाधव, रवि देवकर ,प्रल्हाद लोहार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास वारणा परिसरामधील विविध संस्थांचे पदाधिकारी,  शिक्षक,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.प्रा. पी. बी. बंडगर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

You may also like

Leave a Comment