महाराष्ट्र

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट मधील विविध कोर्सेसना प्रवेशासाठी मुदत वाढ

by संपादक

             कोडोली( प्रतिनिधी )पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई (MSBSVET) बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू असून सर्व कोर्सेसना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती संचालक सुनीलकुमार पाटील यांनी दिली.

                इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साईट, ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन, इलेक्ट्रिक वायरमन ,मोटार आर्मिचर वायडिंग, टू- व्हीलर व फोर- व्हीलर मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर विथ एम. एस. ऑफिस, पर्सनल कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स, एअर कंडिशन रेफ्रीजरेशन मेकॅनिक ,प्लंबर, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल या कोर्सेसना प्रवेश देणे सुरू असून आठवी, दहावी, बारावी पास/ नापास अशी प्रवेशासाठी पात्रता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार यांनाही या कोर्सेसना प्रवेश घेता येतो. या कोर्सेससाठी मराठी व इंग्रजी अशी दोन्ही माध्यम उपलब्ध असून भरपूर प्रॅक्टिकल घेतली जातात.

                 विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी एस.टी. बस पास सवलतअसून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १००%, दिली जाते. याबरोबर विविध लायसन संदर्भात मार्गदर्शन केले जाते. प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, प्लॉट नंबर ११, नवीन राधिका रोड, एसटी स्टँड जवळ, सातारा येथे ऑफिस वेळेत संपर्क साधावा.

You may also like

Leave a Comment