महाराष्ट्र

सांगलीत ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा

by संपादक

            सांगली : (प्रतिनिधी )भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वाची सुरुवात नऊ ऑगस्ट 1942 ला झाली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने या दिवशी आरपारची लढाई करण्याची घोषणा केली. ‘भारत छोडो’ ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणांनी मुंबई शहर दुमदुमले या लढ्याला सातारा जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारने क्रांतिकारक भूमिका वठवली. 

              या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन या लढ्याला 82 वर्षे पूर्ण होत असताना सांगली येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला शेकडो मुले-मुली स्वातंत्र सैनिकांचे वारसदार शिक्षक नागरी बंधू भगिनीसह पुरोगामी विचाराच्या वारसदारांनी या देशात पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई करण्याची शपथ घेऊन प्रतिगामी शक्तींचा बीमोड करण्याची शपथ घेतली. 

              क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या वर्षात प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम प्रबोधनाच्या दृष्टीने घेण्याचे याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्र्य सन्मान समितीचे संयोजक ॲड.अजितराव सूर्यवंशी यांनी जाहीर केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापुढे झालेल्या भव्य कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थिनींनी लेझीमचे खेळाचे पाच डाव सादर केले . तदनंतर  महाराष्ट्र शाहीर बजरंग आंबी यांनी पहाडी आवाजात क्रांतीदिनानिमित्त पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज शिंदे यांनी केले. केबीपी स्कूलच्या विद्यार्थिनी मैत्री शहा हिने क्रांती दिनावर प्रभावी भाषण केले.याप्रसंगी महापालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार शहाजीराव जाधव यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. 

            रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज, पंडित नेहरू विद्यालय कवलापूर, कर्मवीर भाऊराव पाटील स्कूल म्हैशाळ, केबीपी इंग्लिश मेडियम स्कूल सांगली या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गणेश नाष्टा सेंटरचे मालक आनंदराव सावंत यांनी सर्व उपस्थितांच्या अल्पोउपहाराची व्यवस्था केली.

              या कार्यक्रमास ॲड.तेजस्विनी सूर्यवंशी, प्रा. सिकंदर जमादार , ॲड.अमित शिंदे, जब्बार बारस्कर, दीपक पाटील, अनिल माने ,अमोल माळी, जयसिंगराव सावंत ,महावीर कोथळे ,संतोष पत्रावळे, मोहनराव देशमुख, प्रशांत पवार, उद्योजक विनोद पाटील, शशिकांत ऐनापुरे, अमृता चौगुले, किरण पाटील,नितीन मिरजकर, शशिकला घाडगे, रंगराव शिपूगडे, विठ्ठलराव काळे, रवींद्रनाथ घाडगे,नंदिनी बिरजे, रत्नाकर गोंधळी ,माधुरी कोरे, सुनिता ऐवळे ,उत्तमराव कांबळे, प्रशांत पवार , अप्पासाहेब पाटील,यासह नागरिक उपस्थित होते.रेखा पाटिल यांनी आभार मानले.

You may also like

Leave a Comment