कोडोली( प्रतिनिधी) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पन्हाळा व शाहूवाडी या दोन्ही तालुक्यांमध्ये आलेल्या एकूण अर्जापैकी ८६ हजार२६६ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहिती पन्हाळा- शाहूवाडी चे आम.तथा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे विधानसभास्तरीय अध्यक्ष आम. विनय कोरे यांनी दिली.
शाहूवाडी येथील तहसीलदार कार्यालयात विधानसभास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना समितीची बैठक आम. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणेत येत असलेला तसेच जनसुराज्यशक्ती व सुराज्य फौंडेशनच्या माध्यमातून शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचे ‘मोफत नोंदणी अभियान’ राबविणेत आले होते.यामध्ये शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदविला आणि कमीत कमी दिवसामध्ये उच्चांकी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली.
शाहूवाडी तालुक्यात ३४ हजार ७७१ तर पन्हाळा तालुक्यात ५१ हजार ४५५ असे दोन्ही तालुक्याचे मिळून एकूण ८६ हजार २२६ एवढे उच्चांकी अर्ज ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून प्राप्त झाले.या पात्र झालेल्या अर्जाची छाननी करून आम. विनय कोरे यांनी मंजुरी दिली.शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील ८६ हजार २२६ महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनची भेट म्हणून १९ ऑगस्ट रोजी जून व जूलै या महिन्याचे ३ हजार रुपयांचे अनुदान खातेवर जमा होणार असल्याची माहितीही यावेळी विधानसभास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना समितीचे अध्यक्ष आम.विनय कोरे यांनी दिली.
यावेळी पन्हाळा – शाहूवाडी प्रांत आधिकारी समीर शिंगटे, शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण,पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.