कोल्हापूर

चांगला माणुस होण्यासाठी चांगले विचार आत्मसात करा- संभाजी यादव

by संपादक

जोतिर्लिंग पब्लिक स्कुल मध्ये आनंददायी उपक्रम

            कोडोली(प्रतिनिधी)आयुष्यात प्रत्येकालाच चांगला माणुस म्हणुन संबोधले जावे अशी भावना असते.चांगला माणुल बनण्यासाठी चांगले विचार आत्मसात करा.असा सल्ला प्रसिद्ध विनोदी कलाकार संभाजी यादव कौलवकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.ते महाराष्ट्रशासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमातंर्गत जोतिर्लिंग पब्लिक स्कुल,माले य़ांच्यावतीने आयोजित हसण्यासाठी जगा…आणि जगण्यासाठी हसा…या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

                कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी संस्थापक शिवलिंग कळंत्रे,मुख्याध्यापिका सविता कळंत्रे,धनाजी पाटील,किरण यादव,उपमुख्याध्यापक सतिश रणभिसे,सचिन कोडोलकर,एस.एम.कांबळे  आदी मान्यवर उपस्थित होते.

                  यावेळी संभाजी यादव यांनी आपल्या विनोदीशैलीने हास्याचे फवारे उडवले.विविध अभिनेत्यांचे-राजकीय नेत्यांचे आवाज,विविध पशु-पक्षी,कडक लक्ष्मीच्या वाद्याचा आवाज,कलापथकाच्या संगीताचा आवाज त्यांनी आपल्या कठंटातुन अगदी अचुक पणे काढले.वेगवेगळे आवाज आणि विनोदामुळे जोतिर्लिंग मध्ये हास्य जत्रे स्वरुप प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांचे मनोरंजन चांगल्या पध्तीने झाल्याने कार्यक्रमाला एक वेगळा रंग चढला होता.

                संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांनी संभाजी यादव हे ७५ टक्के दिव्यांग  असुन देखील त्यांनी कोणतेही खंत न बाळगता आपला प्रवास सुरु ठेवला आहे.त्यामुळे इच्छा जर प्रबळ असेल आणि जिद्द ,चिकाटी ठेवल्यास आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकतो.याचे मुर्तीमंत उदाहऱण म्हणजेच संभाजी यादव कौलवकर आहेत,असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार एस.एम.कांबळे यांनी मानले.

You may also like

Leave a Comment