कोल्हापूर

कोरोना, महापूर या वैष्विक संकटाने जीवनाची क्षणभंगुरता आणि सुंदरता कळाली- महेंद्र कुलकर्णी

by संपादक

             वारणानगर (प्रतिनिधी)कोरोना आणि महापूराच्या वैष्विक संकटामुळे आपणास जीवन किती क्षणभंगुर आहे याची शिकवण मिळाली त्यामुळे  जीवन सुंदर करण्यासाठी पहिल्यांदा इतरांचे जीवन सुखी करा असा मौलिक सल्ला वक्ते महेंद्र कुलकर्णी यांनी दिला. 

                येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेत ” क्षणिक परि सुंदर ” या विषयावर बोलताना महेंद्र कुलकर्णी  पुढे म्हणाले की आजकाल घराघरात माणसा माणसात द्वेषाने वितूष्ठ येताना दिसत आहे. नवी पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन विचार शुन्य बनत आहे. वयोवृद्ध आणि वयस्कर माणसांची विचारपूस आणि सांभाळणूक करण्यात मोठी अडसर वाटत आहे परिणामी वृध्दाश्रमाच्या आश्रयाला जावे लागत आहे. नात्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. कोरोना आणि महापूर सारख्या भयानक संकटाने जगणं किती महत्वाचे आहे. संकटे कशी भयानक असतात. आजही केवळ त्या संकटाची केवळ आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात.ज्यांना कोरोना झाला होता त्यांना पुनर्जन्म झाल्याची प्रचीती आली आहे. त्यामुळे जीवन क्षणभंगुर आहे. म्हणून मिळालेले जीवन सुंदर करण्यासाठी चांगले आचार, विचार ,आहार ,विहार, या गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत तरच क्षणिक असलेले जीवन सुंदर होईल असे वक्ते महेंद्र कुलकर्णी यांनी समारोपाच्या व्याख्यानावेळी आपले मत व्यक्त केले.

              याप्रसंगी  निवृत्त शिक्षिका आणि वारणा भगिनी मंडळाच्या संचालिका रमाताई काशिद यांच्या हस्ते  महेंद्र कुलकर्णी  यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमाला यशस्वी पार पाडल्याबद्दल संयोजक ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांचा सत्कार वारणा दुध संघाचे संचालक, शिवाजीराव जंगम  यांनी केला केला. या कार्यक्रमास प्रमोद कोरे, के जी जाधव, सुरेश साखरपे,ऋतुगंध कूलकर्णी,शशिकांत कुलकर्णी, सुरेश साखरपे,संभाजी मुदगल,प्रतिभा कोले,आदींसह   वारणा समुहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी  मान्यवर विद्यार्थी, रसिक श्रोते उपस्थित होते.  पाहुण्यांचा परिचय प्रा नामदेव चोपडे यांनी करून दिला. आभार ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी मानले.

You may also like

Leave a Comment