कोल्हापूर

छत्रपती शाहू संस्थेच्या माध्यमातून तरुणांना उद्योग उभा करण्याची संधी मिळाली- डॉ. अशोकराव माने

by संपादक

              जयसिंगपूर (प्रतिनिधी) छत्रपती शाहू को- ऑपरेटिव्ह इंडस्ट्रिअल इस्टेट या संस्थेच्या माध्यमातून वाटचाल करीत असताना ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. असे सांगून येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून उद्योजकांच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेऊन संस्थेचा विकास केला जाईल असे आश्वासनसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिले.

            मौजे आगर येथे छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीअल इस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली यावेळी ते बोलत होते. व्यवस्थापक सुरेंद्र तिवडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. स्वागत प्रस्ताविक उपाध्यक्ष संजय पाटील- चिपरीकर यांनी केले. ते म्हणाले डॉ.अशोकराव माने यांनी या संस्थेच्या प्रगतीसाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची चांगली संधी आहे .त्याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

             जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषसिंग रजपूत यांनीही डॉ. अशोकराव माने यांच्या कार्याचा आढावा विशद केला. यावेळी सुरेश रेडेकर, भारत माणगाव, निलेश शिंदे, डॉ. अरविंद माने, दयानंद जाधव, पंकज दौंडे, बबन बने, रेखा कांबळे, अश्विनी गायकवाड, सुधा वायचळ, सागर कोळी, सुहास राजमाने, अतुल साखरपे, राम बोडगे, चंद्रकांत टारे, चंद्रशेखर मुंडे, सागर चावरे, विलास बिंदगे, दीपक बुबणे, संतोष माने यांच्यासह सभासद उपस्थित होते.

You may also like

Leave a Comment