कोडोली (प्रतिनिधी)श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित महाराष्ट्र शासनाच्या समूह विद्यापीठ संकल्पनेच्या अंतर्गत होऊ घातलेल्या वारणा स्टेट पब्लिक विद्यापीठाच्या माहिती संसाधन केंद्र, संचालक पदी आणि तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील कम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग विभागात प्रोफेसर म्हणून डॉ. शशीकुमार तोटद यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
डॉ.शशीकुमार तोटद शैक्षणिक आणि प्रशासकीय सेवेचा ३२ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी जीएमआर,राजम, आंध्र प्रदेश, के. एल. ई. टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी हुबळी यासारख्या नामांकित संस्थेमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागात प्रोफेसर आणि विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. डॉ. तोटद यांची आत्तापर्यंत तीन पेटंट भारत सरकारने प्रकाशित केले आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयर कोरे यांनी अभिनंदन केले. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, डीन डॉ. एस. एम. पिसे, प्रभारी प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, यांच्यासह वारणा विद्यापीठाचे संचालक ,सर्व विभागप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.