कोडोली (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या वतीने जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिरोली एम.आय.डी.सी. येथील रत्ना उद्योग या कंपनीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सौ.राजश्री पाटील ,मनोहर पाटील, सचिन पाटील, नितीन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय ,मुंबई यांच्या वतीने प्रत्येक वर्षी जिल्हा पातळीवर जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यशस्वी लघु उद्योजकांना पुरस्कार प्रदान केला जातो.सन २०२२-२३ मध्ये रत्ना उद्योग समूहाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या उद्योग समूहास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सौ.राजश्री पाटील आणि मनोहर पाटील यांनी २००४ मध्ये रत्ना उद्योग ची स्थापना केली. गेल्या वीस वर्षात कंपनीचे संचालक सचिन पाटील आणि नितीन पाटील यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील अभ्यास करून कंपनीत तयार होणारे ४५% उत्पादन निर्यात करण्यावर भर दिला. याची दखल घेऊन वरील पुरस्कार देण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते.