राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन
कोडोली (प्रतिनिधी) येथील नगरभूमापन कार्यालयात परीक्षक भूमापन अधिकारी यांची तातडीने नेमणूक करून नागरिकांची होणारी गैरसोयी दूर करावी अशा मागणीचे निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अदीक जाधव यांनी दिले.
गेले कित्येक महिन्यापासून कोडोली भूमापन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने नागरिकांना त्यांच्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. याबरोबरच तलाठी कार्यालयातील मंडल अधिकारी व तलाठी यांची बदली झाल्याने गेले तीन ते चार महिने या कार्यालयाचे कामकाज ठप्प आहे. तरी या दोन्ही कार्यालयात तातडीने अधिकार्यांची नेमणूक करून नागरिकांची गैरसोय टाळावी असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी पन्हाळा- शाहूवाडी विधानसभा अध्यक्ष संदीप जाधव समीर शेख, युवराज गोसावी, ओंकार माने, रोशन काळे, निलेश महापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.