कोल्हापूर

गोकुळच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करा- अमरसिंह पाटील

by संपादक

            कोडोली (प्रतिनिधी) गोकुळ दूध संघाने नुकत्याच जाहीर केलेल्या सायलेस बॅग व विमा योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून गोकुळ दूध संघाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा उत्पादकांनी लाभ घेऊन आपला व आपल्या परिवाराचा आर्थिक विकास करून घ्यावा असे आवाहन गोकुळ संचालक अमरसिंह पाटील यांनी केले.

           कोडोली येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्था ,यशवंतराव चव्हाण दूध संस्था व हनुमान दूध संस्था या तीन संस्थांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.  यशवंतराव चव्हाण पतसंस्था व हनुमान दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव धर्मेंद्र शेळके यांनी केले तर यशवंतराव दूध संस्थेचे अहवाल वाचन महेश मतसागर यांनी केले.

            अमरसिंह पाटील म्हणाले तीनही संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पारदर्शक व काटकसरीचा कारभार करून संस्थेची प्रगती केली आहे. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद असून पतसंस्था येत्या आर्थिक वर्षात परिपूर्ण नफ्यात येईल यानंतर सभासदांना लाभांश देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी म्हैस दूध उत्पादकांना एक रुपये तर गाई दुधासाठी साठ पैसे फरक बिल देण्याचे जाहीर केले.

           यावेळी हनुमान दूध संस्थेचे सभासद छाया भानुसे, सर्जेराव मोरे, मंदा लोंढे, अशोक पाटील, सुजाता शेळके, माणिक पाटील तसेच यशवंतराव चव्हाण दूध संस्थेचे सभासद विक्रम गोसावी, संतोष मगदूम, संदीप मतसागर, नंदा पवार, दिलीप पाटील, महेश मतसागर या दूध उत्पादकांनी संस्थेस जास्तीत जास्त दूध पुरवठा केल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

            याप्रसंगी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन आप्पासाहेब मतसागर, व्हा. चेअरमन गणपती शेडगे ,हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष बळवंत राबाडे ,उपाध्यक्ष माणिक पाटील, यशवंतराव चव्हाण दूध संस्थेचे अध्यक्ष शंकर मगदूम, उपाध्यक्ष संपत पाटील, कोडोली ग्रामपंचायतचे उपसरपंच माधव पाटील, पन्हाळा अर्बनचे चेअरमन प्रवीण पाटील,कोडोली हौसिंगचे चेअरमन मानसिंग पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे संचालक, सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश शेडगे यांनी केले तर आभार संजय मतसागर यांनी मानले.

You may also like

Leave a Comment